Edible Oils 2024 खाद्यतेलाच्या किमतीत मोठी घसरण, , पहा आजचे 15 लिटर तेलाच्या डब्याचे नवीन दर

Edible Oils 2024 : सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी. खाद्यतेलाचे दर घसरले. महिनाभरात शेंगदाणा तेलाचा १५ किलोचा डबा चारशे

रुपयांनी स्वस्त झाला आहे. जाणून घ्या नवे भाव…भाज्यांच्या वाढलेल्या दरांमुळे गृहिणींचे बजेट कोलमडलेले असताना खाद्यतेलाच्या

किमतीने थोडा दिलासा मिळला आहे. गेल्या महिनाभरापासून घाऊक बाजारात शेंगदाणा तेलासह इतर खाद्यतेलांचे दर घसरण्यास

सुरुवात झाली आहे. बाजारात जवळपास वर्षभरानंतर शेंगदाणा तेल उतरणीला लागले आहेत. महिनाभरात शेंगदाणा तेलाचा १५

किलोचा डबा चारशे रुपयांनी स्वस्त झाला आहे. Edible Oils

15 लिटर तेलाच्या डब्याचे नवीन दर जाहीर

येथे पहा नवीन दर

जिल्ह्यात मलेशिया आणि इंडोनेशियामधून पाम तेलाची, तर युक्रेनमधून सूर्यफूल तेलाची सर्वाधिक आयात केली जाते. सरकारने

खाद्यतेलांवरील आयात शुल्क कमी केल्याने खाद्यतेलांचे दर घसरण्यास सुरुवात झाली आहे. तसेच भुईमूग, सोयाबीन पिके चांगली

आली असून, तेलबियांचे अधिक उत्पादन झाले आहे. त्यामुळे कच्च्या तेलाचे दर कमी झाले आहे. याचबरोबर सण-उत्सवांनंतर आता

खाद्यतेलांची मागणीही घसरल्याने अधिक पुरवठा उपलब्ध आहे. या परिणामांमुळे शेंगदाणा तेल वगळता, इतर खाद्यतेलांचे दर गेल्या

वर्षभरापासून घसरलेले होते. यंदा भुईमूगच्या उत्पादनात वाढ झाल्याने शेंगदाणा तेलाचेही दर कमी झाले आहेत. शेंगदाणा तेल

जवळपास २० ते २५ रुपये प्रतिकिलोने स्वस्त झाले आहे.

पॅकेजिंग खर्चही घटला Edible Oils 2024

Edible Oils देशात इंधनाचे दर काही प्रमाणात आवाक्यात आले आहे. याचबरोबर आयात करतानाचा पॅकेजिंगचा खर्चही कमी झाला आहे. याचाही थेट परिणाम खाद्यतेलांच्या दरांवर होत असल्याचे, व्यावसायिकांकडून सांगितले जात आहे.

गतवर्षी तेलबियांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाल्याने तेलाचे दर घसरले आहेत. वर्षभरापासून शेंगदाणा तेलांच्या दरात प्रचंड वाढ झाली होती. हेच दर आता कमी होत असून, पुढील काही दिवसांत दर अधिक घसरण्याची शक्यता आहे.- प्रकाश पटेल, उपाध्यक्ष, महाराष्ट्र खाद्यतेल व्यापारी संघटना

असे आहेत दर (१५ किलो/ लीटर)
सोयाबीन : १५७५ रुपये
सुर्यफुल : १५५५ रुपये
शेंगदाणा : २७३० रुपये

Leave a Comment