BPL Ration Card Loan Scheme : रेशन कार्डवरही मिळणार 10 लाखांपर्यंत लोन, कुठे आणि कसा करायचा अर्ज?

BPL Ration Card Loan Scheme : कर्जाची रक्कम दोन लाख ते 10 लाख रुपयांपर्यंत असू शकते आणि यावरील व्याजदरही सामान्य कर्जापेक्षा खूपच कमी असतो.

देशातील कोट्यवधी नागरिकांकडे शिधापत्रिका (रेशन कार्ड) आहेत. अन्नपूर्णा योजने अंतर्गत केंद्र सरकार सुमारे 80 कोटी नागरिकांना मोफत रेशन पुरवत आहे. तुम्हीही रेशन कार्डवर (BPL Ration Card) मोफत रेशनचा लाभ घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. सरकार रेशनकार्डवर मोफत धान्यासह स्वस्त दरात कर्जही देते.

रेशन कार्डवरही मिळणार 10 लाखांपर्यंत लोन

कुठे आणि कसा करायचा अर्ज?

हरियाणा सरकार आपल्या राज्यात अशी योजना राबवत आहे. दारिद्र्यरेषेखालील शिधापत्रिका (बीपीएल) असलेल्यांनाच या योजनेचा लाभ दिला जात आहे. बीपीएल कार्डधारकांच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य सरकार ही योजना राबवत आहे. नॅशनल शेड्युल्ड कास्ट फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनद्वारे (NSFDC) हे कर्ज दिलं जातं. फक्त व्यवसायासाठी अशा प्रकारचं कर्ज उपलब्ध करून दिलं जात आहे.

ही योजना कोणासाठी आहे?

BPL Ration Card Loan Scheme

हरियाणा सरकारने ही योजना अनुसूचित जातीतील बीपीएल कार्डधारकांसाठी सुरू केली आहे. अनुसूचित जाती अर्थ व विकास महामंडळामार्फत स्वयंरोजगार योजने अंतर्गत ही योजना चालवली जात आहे. या योजनेत तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी 10 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज दिलं जातं. व्याजावर सूट देखील उपलब्ध आहे. त्यामुळे प्रभावी व्याज दर चार ते सहा टक्क्यांपर्यंत खाली येतो.

अर्ज कसा करावा?

– बँकेत जाऊन कर्जाची संपूर्ण माहिती मिळवा.
– तुम्हाला बँकेतून अर्जही मिळेल.
– सर्व आवश्यक कागदपत्रं जोडल्यानंतर फॉर्म बँकेत सबमिट करा.
– कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर बँक तुम्हाला तुमच्या गरजेनुसार कर्ज देईल.
– यावर आकारल्या जाणाऱ्या व्याजावर सरकारकडून अनुदान मिळतं.

बीपीएल शिधापत्रिका कोणाला मिळू शकते?

दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना बीपीएल रेशन कार्ड (BPL Ration Card) काढता येतं. हरियाणा सरकारच्या मते, ज्या कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न 1.80 लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्यांना बीपीएल कार्डसाठी पात्र मानलं जातं. हरियाणा सरकारने आता हे कार्ड फॅमिली आयडीशी लिंक केलं आहे आणि लोकांना ऑनलाइन बीपीएल कार्ड दिली जातात. भारतामध्ये कोट्यवधी नागरिकांकडे बीपीएल रेशन कार्ड आहेत. तुम्ही देखील त्यापैकी एक असाल तर तुम्हाला व्यवसायासाठी कमी व्याजदरात सरकारी कर्ज मिळू शकतं.

Leave a Comment