Bank Cash Deposit Rule 2024 | बेकायदा आणि बेहिशोबी रोखीला आळा घालण्यासाठी सरकारने नवीन नियम लागू केला आहे. काय नियम जाणून घेऊयात.
Bank Cash Deposit Rule | बेकायदा आणि बेहिशेबी रोखतील व्यवहारांना लगाम घालण्यासाठी केंद्र सरकारने नवीन नियम लागू केले आहेत. सरकारने रोख रक्कम काढण्याच्या मर्यादेत बदल केला आहे. आता यापुढे तुम्हाला बँकिंग व्यवहार (Banking Transaction) करण्यासाठी काळजी घ्यावी लागेल. मोठ्या रक्कमांचा व्यवहार करताना सरकारने ठरवून दिलेल्या नियमांचे (Rules) पालन करणे तुम्हाला ही बंधनकारक असेल.
आता या दोन कागदपत्रांशिवाय बँकेत कॅश जमा होणार नाही
येथे पहा कोणते कागदपत्रे लागणार
रोख रक्कम भरण्यासाठी (Bank Cash Deposit Rule Changed) केंद्र सरकारने कडक पावले टाकली आहेत. सरकारने रोख रक्कम काढण्याच्या मर्यादेत बदल केला आहे. एका आर्थिक वर्षात एक किंवा अधिक बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोकड जमा (Amount deposit) करण्यासाठी पॅनकार्ड (Pan card)आणि आधार कार्ड (Aadhar Card) अनिवार्य करण्यात आले आहे. म्हणजेच आता मोठ्या रक्कमा बँकेत जमा करताना तुम्हाला पॅन कार्ड आणि आधार कार्ड दाखवावे लागणार आहे. इतकेच नव्हे तर रोख रक्कम भरणा केल्यास किंवा निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक रोख रक्कम मिळाल्यास जबर दंडाची (Penalty) तरतूदही करण्यात आली आहे.
किती रक्कमेसाठी नियम लागू?
नव्या नियमांनुसार आता बँकांमध्ये 20 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा करणे किंवा काढणे यावर बंधनकारक करण्यात आले आहे. 10 मे 2022 रोजी सरकारने या नियमांची अंमलबजावणी करणारी अधिसूचना जारी केली. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) प्राप्तिकर नियम 2022 अंतर्गत नवे नियम तयार केले आहेत. हे नवीन नियम लागू झाल्यानंतर एखाद्या व्यक्तीने आर्थिक वर्षात एकूण 20 लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम जमा केली तर. कोणत्याही बँकिंग कंपनी, सहकारी बँक किंवा पोस्ट ऑफिसमधील एक किंवा अधिक खात्यांमध्ये पॅन आणि आधार कार्ड देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
ज्यांच्याकडे पॅन नाही ते कसे व्यवहार करणार? Bank Cash Deposit Rule 2024
ज्यांच्याकडे पॅन कार्ड नसेल त्यांना दिवसाला 50 हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या कोणत्याही व्यवहारात किमान सात दिवस आधी पॅनसाठी अर्ज करावा लागणार आहे. त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीने बँकिंग कंपनी, सहकारी बँक किंवा पोस्ट ऑफिस यांच्या एक किंवा अधिक खात्यांमधून आर्थिक वर्षात एकूण 20 लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम काढल्यास त्याला पॅन किंवा आधार कार्ड द्यावे लागेल.