teacher student photoshoot:सहलीला गेलेल्या शिक्षिका आणि विद्यार्थी यांचे नको ते फोटो व्हायरल, पहा फोटो व्हिडिओ

सहलीला गेलेल्या शिक्षिका आणि विद्यार्थी यांचे नको ते फोटो व्हायरल

पहा फोटो

सोशल मीडियावर अनेक फोटो आणि दररोज व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही चर्चेचा विषय ठरतात. तर काहींवरून वादाला तोंड फुटतं. असेच काही फोटो सध्या व्हायरल होत असून, सोशल मीडियावरून या फोटोंबाबत संताप व्यक्त होत आहे. एक शिक्षिका आणि एका विद्यार्थ्याचे फोटो व्हायरल झाले असून, ते सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहेत. तसेच त्यांच्यावर टीकाही होत आहे. हे संपूर्ण प्रकरण कर्नाटकमधील चिंतामणी तालुक्यातील असून, येथील मुरुगमल्ला गावामध्ये एका सरकारी हायस्कूलमधील महिला प्रिंसिपल आणि एका विद्यार्थ्याने हे फोटो काढले होते. हे प्रकरण समोर आल्यानंतर या प्रिंसिपलच्या चौकशीला सुरुवात झाली आहे.karnataka teacher student photoshoot original

teacher student photoshoot

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोंमध्ये महिला शिक्षिका आणि विद्यार्थी हे रोमँटिक पोझ देताना दिसत आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्याचे पालक संतप्त झाले असून, त्यांनी संबंधित शिक्षिकेविरोधात कारवाईची मागणी केली आहे. फोटोंमधील विद्यार्थ्याने कुर्ता आणि जिन्स परिधान केली आहे. तसेच तो शिक्षिकेसोबत वेगवेगळ्या पोझ देत आहे. फोटोशूटदरम्यान, तो कधी प्रिंसिपलला किस करताना, तर कधी त्यांच्या साडीचा पदर पकडताना दिसत आहे. आता या शिक्षिकेवर अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या शिक्षिकेने सहलीवेळी विद्यार्थ्यासोबत मोबाईलमध्ये काही रोमॅटिक फोटो काढले होते, असे सांगण्यात येत आहे.

Leave a Comment