Gram Panchayat New Rules : गावात महिला सरपंचांच्या कारभारात त्यांचे पती तसेच नातवाइकांच्या हस्तक्षेपाची मोठी ओरड आहे. परंतु आता महिला सरपंचांच्या पती किंवा नातेवाइकांच्या ग्रामपंचायतींच्या कारभारात लुडबुडीला लगाम बसणार आहे.या संदर्भात शासनाने ग्रामपंचायतींसाठी नवा आदेश काढला आहे. यात अशी लुडबूड झाल्याचे दिसून आल्यास कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेमधील विविध अधिकारी, कर्मचाऱ्यांना संबंधित जिल्हा परिषद पदाधिकारी, सदस्य तसेच त्यांचे नातेवाइकांकडून अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले होते.
शासनाकडून ग्रामपंचायतीसाठी नवीन नियम लागू
सरपंचांना पाळावे लागणार हे नियम
याच पार्श्वभूमीवर आता महिला सरपंचांचे पती अथवा नातलगांना कार्यालयीन कामकाजात हस्तक्षेप होऊ नये, यासाठी नवा शासन आदेश काढला आहे. प्रामुख्याने अल्पशिक्षित किंवा बाहेर वावरण्याची सवय नसेल, तर त्या ठिकाणी कारभारात हस्तक्षेप होतो.अशा पद्धतीने जर महिलांच्या काराभारात पती अथवा नातेवाईक हस्तक्षेप करत असतील, तर त्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा शासनाने आदेशात दिला आहे.
स्थानिक स्वराज्य निवडणुकीत महिलांना ५० टक्के आरक्षण जाहीर केले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणची सरपंच पदे महिला राखीव होतात. अशा वेळी पत्नीला निवडणुकीत उभे केले जाते. सर्व कारभार पतीराजच पाहतात. पती अथवा नातेवाईक यांच्या हस्तक्षेपाविरोधात अनेकदा आंदोलनेदेखील झाली.त्यामुळे महिला आरक्षणाच्या उद्देश सार्थकी लागत नव्हता. ही बाब लक्षात घेऊन राज्य शासनाने सरपंच महिलेचे पती किंवा इतर नातेवाइकांनी ग्रामपंचायत कारभारात हस्तक्षेप केला, तर संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद केली आहे. त्यामुळे आगामी काळात महिला सरपंचांच्या पतीराजांची कारभारातील लुडबूड कमी होणार आहे Gram Panchayat New Rules.
ग्रामसभेतही बसतात पतीराज :-
सरपंच महिलेचे पती किंवा नातेवाईक चक्क ग्रामसभेतदेखील समोरच्या खुर्चीवर बसतात. ग्रामपंचायतीत घेण्यात आलेल्या ठरावांवरही सरपंचांचे पतीराजच निर्णय घेतात. काही ठिकाणी पतीराज बैठकांना बसतात. हे आता बंद होणार आहे. तसेच सरपंचांच्या कक्षात देखील त्यांच्या नातेवाइकांना बसता येणार नाही किंवा त्या ठिकाणी बसून कोणत्या निर्णयावर चर्चाही करता येणार नाही
शासनाकडून ग्रामपंचायतीसाठी नवीन नियम लागू; सरपंचांना पाळावे लागणार हे नियम,नियम न पाळल्यास होणार अपात्र