तुमच्या फॉर्मचे स्टेटस कसे चेक कराल?
सर्वप्रथम नारीशक्ती दूत अॅप उघडा आणि त्यामध्ये लाभार्थी महिलेचा मोबाईल नंबर टाका.
यानंतर तुम्ही तुमचे अकाउंट लॉग इन करा. अकाउंट लॉग इन केल्यानंतर तुम्हाला ओटीपी येईल हा ओटीपी वेरिफाय करा.
लॉग इन केल्यानंतर मेन्यू मध्ये योजनांची सूची येईल, यामध्ये माझी लाडकी बहीण योजना निवडा.
त्यानंतर यापूर्वी केलेले अर्ज असा पर्याय येईल. त्यावर क्लिक करुन तुम्ही अर्जाचे स्टेट्स पाहू शकतात.
अर्ज उघडल्यावर तुम्हाला चार पर्याय पाहायला मिळतील. त्यात Verification done , IN pending To submit, Edit Form असे पर्याय दिले जातील.
लाडकी बहीण योजनेचा फॉर्म मंजूर झाला का?
- जर इन पेंडिंग टू सबमीट (IN pending To submit) दाखवत असेल तर तुम्ही अर्ज भरला आहे परंतु तो पुनरावलोकनासाठी सबमिट केलेला नाही.
- येथे अप्रुव्हड (Approved) असे दिसत असेल, तर तुमचा अर्ज स्विकारला गेला आहे.
- इन रिव्ह्यूव (In Review) असे दिसत असेल तर तुमच्या फॉर्मचे मुल्यांकन केले जात आहे.
- Rejected असे दिसत असेल तर तुमचे अर्ज स्वीकारले गेलेले नाही.
- डिसअप्रुव्ह – कॅन एडीट अँड रिसबमीट (Disapprove- Can Edit And Resubmit) असे दिसत असल्यास तुमचे फॉर्म काही कारणांनी स्विकारले गेलेले नाही.त्यामुळे तो पुन्हा एकदा सबमिट करावा लागेल.